ऑफिस बॉयचा जबाब आणि कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम, सगळी गॅंग तर अडकलीच सोबत खरा घटनाक्रमही पुढे आला..

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांना दिलेल्या जबाबात देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता सगळंच समोर आला आहे. वाल्मिक कराडच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे.
या खंडणी प्रकरणात संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, असं वाल्मिक कराड याने सांगितले होते, अशी कबुली सुदर्शन घुले यानं दिली आहे. या प्रसकरणात हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यामुळे वाल्मीक कराडसह संपूर्ण गँग पुरती अडकली आहे.
असे असताना या प्रकरणात एका ऑफिस बॉयमुळे संपूर्ण कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झाला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे सगळी कराड गॅंग अडकणार आहे.
या ऑफिस बॉयचा कबुली जबाब पुढे आला असून वादाची ठिणगी कुठे पडली, याचा घटनाक्रम समोर आला आहे. यामध्ये 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली.
यावेळी सुदर्शन घुले याने मी वाल्मीक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये खंडणी द्या. नाहीतर कंपनी बंद करा, अशी धमकी दिली होती. घुलेच्या इतर साथीदारांनी देखील दमदाटी केली होती. यावेळी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले. त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, असे सांगितले
तसेच लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली होती. मात्र सुदर्शन घुलेनं सरपंचांना धमकी दिली. सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी घुलेनं दिली होती. या सगळ्या गोष्टीचा हाच ऑफिस बॉय साक्षीदार आहे. हा जबाब वाल्मीक कराड गँगला अडकवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे आता लवकरात लवकर सगळ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.