आता प्रत्येक राज्यात होणार तिरुपती बालाजीचे मंदिर! तिरुमला तिरुपती ट्रस्टचा निर्णय…
पुणे : आपल्या देशात देशभरातून तिरुपती बालाजी याठिकाणी अनेज भाविक येत असतात. आता जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने येत्या काही वर्षांत सर्व राज्यांमध्ये भगवान व्यंकटेश्वराची मंदिरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता त्याठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या राज्यातच दर्शन घेता येणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान 1933 मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी तिरुमला मंदिर, तिरुचन्नूरचे श्री पद्मावती मंदिर आणि तिरुपतीचे गोविंदराज स्वामी मंदिर एवढी तीनच मंदिरे देवस्थानच्या अखत्यारित होती.
आता देवस्थानने देशभरात 58 मंदिरांची उभारणी केली आहे. त्यातील बहुतांश मंदिरे आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूत आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानमने नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू भागात तिरुपती मंदिर बांधले आहे.
त्याचे उद्घाटनही झाले आहे. हे ट्रस्ट सध्या आणखी तीन मंदिरे बांधण्याच्या विचारात आहे. यातील एक गुजरातच्या गांधीनगरमध्ये, दुसरा छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आणि तिसरा बिहारमध्ये आहे.
तिरुमाला तिरुपती देवस्थानमने नुकतीच नवी मुंबईतील तिरुपती बालाजी मंदिराची पायाभरणी केली आहे. तिरुपती तिरुमला देवस्थानने हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, दिल्ली आणि भुवनेश्वर येथे बालाजी मंदिरे बांधली आहेत. तिरुमलाच्या बालाजी मंदिरात जे विधी पाळले जातात तेच विधी या मंदिरातही पाळले जाणार आहेत.