मोदींचा वेगळाच प्लॅन! देशात आता एकच निवडणूक.? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय…


नवी दिल्ली : राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार असून सर्व निवडणुका या डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच संदर्भात एक मोठी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून १८ ते २२ सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी हे अधिवेशन बोलावल्याने याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘वन नेशन-वन इलेक्शन’ संदर्भात केंद्र सरकारकडून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करणार आहे. देशात मोदी सरकारची सत्ता आल्यापासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. तर काही राजकीय पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे.

दरम्यान, या मुद्द्यवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतनी सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपची चाल आहे. त्यांनी वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे.

भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही. भाजपवाले इंडियाला घाबरले असल्याचा दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!