आता अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे थेट आदेश..


पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळाली.

मात्र, या विषयी भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अंकुश बसू शकतो या जाणीवेमुळे एक चांगली चपराक बसली आहे.

तसेच रॉयल ग्रुपचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे सभासद प्रफुल कोठारी हे आपल्या एका खासगी कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना भेटण्याचा प्रयत्न केला.

परंतु आपण लोकसेवक आहोत याची जाणीव न राहिल्याने कदम यांनी कोठारी यांना अपमानास्पद वागणूक दिली. अशा कामांसाठी सारखे सारखे पन्नास वेळा येऊ नका, इथं परत यायचं नाही, असे त्यांना कटू शब्दांत सुनावले.

अधिकाऱ्यांनी अशी पद्धतीने चारचौघांत अवमानित केल्याने कोठारी यांना खूप वाईट वाटले. या घडलेल्या प्रकारांची दखल कोण घेणार असा प्रश्न त्यांना वाटू लागला. म्हणून त्यांनी महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना एक मेसेज पाठवला आणि घडलेला प्रकार तक्रारीच्या स्वरुपात त्यांना कळवला.

दरम्यान, विशेष म्हणजे जागरुक असलेल्या बावनकुळे यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नसली तरीदेखील कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते हा दिलासा मोठा असल्याचे कोठारी यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!