राज्यात आता प्रीपेडऐवजी पोस्टपेड मीटर लावणार!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती..


मुंबई : राज्यात आता पोस्टपेड स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. हे मीटर लावल्यामुळे विजेची बचत होणार असून त्यातून ही रक्कम वसूल होणार आहे.अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डिसेन्द्र फडणवीस यांनी दिली आहे. आधी सरकारने प्रीपेड स्मार्ट मीटर लावणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते. फडणवीस यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.

याबाबत ते म्हणाले, दहा वर्षे ग्राहकावर त्याचा भार पडणार नाही. विधिमंडळात सरकारच्या वतीने सुरुवातीला प्रीपेड स्मार्ट मीटर लावले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर सांगण्यात आले की, लावले जाणार आहेत, त्यामुळे सरकारने याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी केली होती.

यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले की, केंद्र सरकारने फिडर मीटर बदलून त्याऐवजी ई-मीटर लावण्यासाठी देशभरातील राज्यांना निधी दिला असून त्यानुसार वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात ही योजना 2020 साली स्वीकारली. याबाबत अनेक फायदे आहेत. यामुळे हे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मीटर बदलण्याची सक्ती करणार नाही. ओसी नसलेल्या इमारती, झोपडपट्टय़ा, कोळीवाडय़ात स्मार्ट मीटरची समस्या सोडवू. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या चार पुरवठादार कंपन्या असून त्यात अदानीच्या कंपनीचा समावेश आहे. चार कंपन्यांपैकी पुणाचेही मीटर लावू शकतात. स्मार्ट मीटरने सगळय़ाची डिजिटल फुटप्रिंट तयार होते.

तसेच ते म्हणाले, केंद्र सरकार 29 हजार कोटी रुपये देत आहे. त्यातही सवलत देत असल्याचे फडणवीस म्हणाले. वन जमिनीवरील ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन योजना तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यामुळे लवकरच याबाबत कामाला गती मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!