आता सोशल मीडियावर पोस्ट करताना जरा जपून, सायबर पोलिसांची आहे करडी नजर, काही चुकले तर थेट…

पुणे : माध्यमांच्या युगात माहिती महत्वाचे साधन झाले आहे. मग ही माहिती विविध माध्यमातून मिळत असते. आता सोशल मीडिया महत्वाचे माध्यम झाले आहे. यामुळे कोणतीही बातमी काही मिनिटांत मोठ्या समुदायापर्यंत पोहचत असते.
अनेक जण आलेल्या माहितीची चैकशी करण्याचे कष्ट न घेता ती फॉरवर्ड करतात. परंतु सोशल मीडियावरील माहिती पुढे पाठवताना काळजी घ्या. अन्यथा एखादी पोस्ट तुम्हाला चांगलीच महागात पडणार आहे. आता तुमच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवण्याचे काम पुणे सायबर पोलिसांनी सुरु केले आहे.
पुणे सायबर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आले. त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्याचे काम सुरु केले आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक पोस्टवर आता सायबर पोलिसांची करडी नजर आहे. यामुळे तुमच्या प्रत्येक पोस्ट सायबर पोलिसांकडून तपासल्या जाण्याची शक्यता आहे.
उशिरा आला पण जोरदार आला! देशभरात तुफान पाऊस, कुठे अतिवृष्टी तर कुठे
दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल होणार आहे. त्या पोस्टद्वारे धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण झाल्यास कारागृहाची हवा खावी लागणार आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
पुणे हादरलं! मित्रांच्या मदतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पुणे पोलीस अधिक सतर्क झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांत विविध प्रकारच्या पोस्ट फिरत होत्या. त्यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी ज्यांनी पोस्ट टाकल्या त्यांच्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली.
आता पुणे पोलिसांनी अधिक लक्ष ठेवण्याचे काम सुरु केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टसंदर्भात २०२२ या एका वर्षात तीन हजारांच्यावर तक्रारी आल्या होत्या. पुणे सायबर पोलिसांकडे या तक्रारी आल्या होत्या.