होळीच्या सुट्ट्यांचे गणित फिस्कटले? होळीनिमित्त 3 आणि 4 मार्चला बँका सुरू की बंद; पाहा RBI ची अधिकृत लिस्ट…


पुणे : होळीच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या सुट्ट्यांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 3 मार्च आणि 4 मार्च रोजी बँकिंग व्यवहार होतील की नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च 2026 मधील बँक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या व्यवहारांचे नियोजन करता येणार आहे. त्यानुसार विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

आरबीआयने ‘March Bank Holiday 2026’ ची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणांनुसार बँक शाखा कोणत्या तारखांना बंद राहतील, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सर्व राज्यांमध्ये सुट्ट्या एकसारख्या नसल्याने ग्राहकांनी आपल्या शहरानुसार तारखा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या यादीत राष्ट्रीय तसेच प्रादेशिक सणांनुसार बँक शाखा कोणत्या दिवशी बंद राहतील, याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. होळी आणि धुळवड हे सण देशभर एकाच दिवशी साजरे होत नसल्याने सर्व राज्यांमध्ये बँक सुट्ट्या समान नसतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आरबीआयच्या यादीनुसार सोमवार, 2 मार्च 2026 रोजी होलिका दहनानिमित्त काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मात्र, हा बंद सर्व राज्यांसाठी लागू नसेल. काही ठिकाणी बँकिंग व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, तर काही निवडक शहरांमध्ये शाखा बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांनी स्थानिक सुट्टीची माहिती आधीच तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदनामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. यामध्ये मुंबई,नवी दिल्ली, कोलकाता रांची, भोपाळ, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, नागपूर, पणजी, बेलापूर आणि विजयवाडा यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये बँक शाखांमधील व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत.

बुधवार, 4 मार्च 2026 रोजी होळीच्या निमित्ताने उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी नवी दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ, कानपूर, पाटणा, रांची, चंदीगड, शिमला, जम्मू, रायपूर, भुवनेश्वर, अगरतळा, इटानगर, शिलाँग आणि इम्फाळ येथे बँकिंग व्यवहार बंद राहतील. मात्र, इतर काही राज्यांमध्ये या दिवशी बँका सुरू असण्याची शक्यता आहे.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, होळी आणि संबंधित सण प्रादेशिक परंपरांनुसार वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात. त्यामुळे बँक सुट्ट्या या स्थानिक सणांच्या आधारे ठरवल्या जातात. याचा थेट परिणाम बँक ग्राहक, व्यापारी, उद्योगधंदे करणारे तसेच शासकीय कामांसाठी बँकांवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!