सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण ; करुणा शर्मांनी केली मोठी मागणी, डीवायएसपी अन डीन…


पुणे : फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासें समोर येत आहेत. अशातच आता स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा-मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी थेट डीवायएसपी आणि डीन यांनाही सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे, तसेच पीएम रिपोर्टमध्ये बदल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संपदा मुंडे प्रकरणात डीवायएसपी आणि डीन यांनाही सह-आरोपी बनवावे. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोणाच्या सांगण्यावरून बदलले जात होते, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. संपदा मुंडे यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या आहे, असा संशय करुणा मुंडेंनी व्यक्त केला आहे.यावेळी त्यांनी या हत्येच्या पाठीमागे निंबाळकर यांचा हात आहे. याचा खरा मास्टर माईंड फलटणचा आका शोधायला पाहिजे, तरच संपदाताईला न्याय मिळेल, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान करुणा मुंडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही जी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चिखल फेक केली आहे, जोपर्यंत रूपाली ताईचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत स्वराज्य शक्ती सेना गप्प बसणार नाही,” असा इशारा करुणा मुंडे यांनी दिला. या प्रकरणाच्या संदर्भात स्वराज्य शक्ती सेनेने कोर्टात दाद मागितली असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे. याबाबत आता आणखीन काय माहिती पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!