NCP MLA Disqualification Case : शरद पवार गटाने राहुल नार्वेकरांना हेरलं! थेट सुप्रीम कोर्टात घेतली धाव, नेमकं काय घडलं?


NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. या प्रकरणी २३ जुलैला मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांनी आमदार अपात्र प्रकरणात शरद पवार गट तसेच अजित पवार गटातील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवले नव्हते. मात्र, पक्षाच्या बाबातीत अजित पवार यांच्याकडे असलेला गट हा मूळ राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला होता. विधिमंडळात असलेल्या सदस्य संख्येच्या निर्णयाच्या आधारे नार्वेकर यांना हा निकाल घेतला असल्याचे सांगितले होते.

शरद पवार गटाने घेतली ने न्यायालयात धाव…

नार्वेकर यांचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने देखील घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला दिले होते. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाबाबत उत्सुकता होती. मात्र, नार्वेकर यांनी विधिमंडळातील सदस्य संख्येच्या आधारे मूळ पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निकाल दिला. या निकाला विरोधात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!