NCP Crisis : पक्ष आणि चिन्ह गेलं, आता कार्यालय जाणार, अजित पवार गटाने दंड थोपटले, नेमकं घडलं काय?


NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच शरद पवार यांना अजून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं आहे. अजित पवार गट आदेश येताच पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यासोबत चिन्हही अजित पवार गटाकडे गेलं आहे. पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही शरद पवार गटाच्या ताब्यातून निसटण्यााची चिन्हं दिसत आहेत. लवकरच अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयेही ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे. NCP Crisis

तसेच वरिष्ठ पातळीवरून आदेश येताच लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ असे  अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हंटले  आहे. मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की, ‘राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळालं, त्यामुळं आपसूक पक्ष कार्यालयं आमच्या बाजूला येईल.

दरम्यान, राज ठाकरेंवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला, पण त्यांना किती यश मिळाले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी त्यांच्या आमदाराला धरुन राहावे, त्याने काही निर्णय घेतला तर हिमालयात जावे लागेल, असं म्हणत मिटकरींनी खोचक टीका केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!