Navratri 2024 : घटस्थापना कधी करायची? मुहूर्त कधीपर्यंत? जाणून घ्या शुभ मुहूर्त…


Navratri 2024 : नवरात्रोत्सवाची तयारी सगळीकडे जोमाने सुरू आहे. गणपतीनंतर आनंदाचा उत्साहाचा आणि मौजमस्ती करण्याचा सण म्हणजे नवरात्री नवरात्री दरम्यान आपण देवीची ९ ची दिवस मनोभावे सेवा करतो. तर या दिवसात 9 दिवस गरबा दांडीया आणि इतर खेळ खेळले जातात.

तसेच ९ दिवस नऊ रंगांचे वेगवेगळे कपडे सुद्धा परिधान केले जातात. तसेच नवरात्रीत आपण अनेक अशा गोष्टी पाहतो. नऊ दिवस वेगवेगळे रंग परिधान करण्यामागे देखील प्रत्येक रंगाची अशी एक कथा आहे.

गुरुवारी ब-ाह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांची आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांनी दिली. Navratri 2024

नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) असून, गुरुवारी (दि. 10) घागरी फुंकून महालक्ष्मीपूजन करावयाचे आहे. शुक्रवारी (दि. 11) महाष्टमी आणि नवमीचा उपवास एकाच दिवशी असून, शनिवारी (दि. 12) विजया दशमीला नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती आणि दसरा आहे, असेही दाते यांनी सांगितले.

दाते म्हणाले, वयोमानामुळे किंवा आरोग्यविषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे उपवास करणे शक्य नाही, त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र, तेही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास तरी करावा.

अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी अशौच निवृत्तीनंतर 5 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर किंवा 11 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि 12 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!