Navi Mumbai : ट्रक चालकाची पोलिसांनाच बांबूने मारहाण, अनेक पोलीस जखमी, नेमकं घडलं काय?


Navi Mumbai : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे वाहतूक व्यावसायिक संतप्त झाले आहेत. देशभरात या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे ट्रक चालकांनी दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारला आहे.

तसेच नवी मुंबई या ठिकाणी देखील या कायद्याच्या विरोधात वाहनचालक रस्त्यावर उतरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र नवी मुंबईमध्ये या आंदोलनाला गालबोट लागले आहे. नवी मुंबईत आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांनी पोलिसांना दगडाने आणि बांबूने मारहाण केली आहे. Navi Mumbai

उरण जेएनपीटी मार्गावरही ट्रक चालकांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरु केले आहे. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. . यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली आहे. दुरुस्तीनंतर वाहन चालकाला 12 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्तीला ट्रकचालकांनी विरोध सुरु केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!