Nari Shakti Vandan Adhiniyam : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नव्या संसदेत ‘या’ विधेयकाची ऐतिहासिक घोषणा…


Nari Shakti Vandan Adhiniyam नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात पहिला कायदा सादर करण्याची घोषणा केली. Nari Shakti Vandan Adhiniyam

ते म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणणार आहे. यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्य करावे, असे आवाहन करत १९ सप्टेंबरचा हा दिवस इतिहासात असेल, असेही त्‍यांनी नमूद केले.

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक सभागृहात मांडले. लोकसभेत चर्चेनंतर हे विधेयक उद्या म्हणजेच २० सप्टेंबरला मंजूर होऊ शकते. हे विधेयक २१ सप्टेंबर रोजी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकानुसार महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे.

१९९६ मध्ये संसदेत यासंदर्भात पहिल्यांदा विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात महिला आरक्षण विधेयक अनेकदा संसदेत मांडण्यात आले. मात्र, बहुमताअभावी त्यावेळी हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

त्यामुळे महिलांना अधिकार आणि सामर्थ्य देण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, ईश्वराने अशी अनेक पवित्रं काम करण्यासाठी माझी निवड केली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!