Narendra Modi : महायुतीच्या प्रचार सभेत पीएम मोदी नसणार? समोर आलं मोठं कारण, जाणून घ्या…

Narendra Modi : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
तसेच निवडणुकीतील उमेदवारांसाठी प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळणार आहेत.
तर, राज्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार आहेत. राज्यात पंतप्रधान आठ दिवस प्रचारासाठी येणार आहेत. मात्र, शेवटच्या प्रचार सभेत पीएम मोदी नसण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीने पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारने लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला. आता जागा वाटपातही उमेदवारांची अदलाबदल करून संबंधित जागा जिंकण्यासाठीची रणनीति आखली जात आहे. Narendra Modi
दरम्यान, आता, राज्यात महायुतीच्या प्रचाराचा धडाका लावण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या परदेश दौऱ्याआधी पंतप्रधान महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे ५ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान १४ नोव्हेंबरनंतर परदेश दौऱ्यावर असल्याने सभांना मिळणार कमी कालावधी आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. प्रचाराच्या तोफा १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहेत.
त्याआधीच्या एक-दोन दिवस आधीच महायुतीची शेवटची प्रचार सभा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे १४ नोव्हेंबर नंतर परदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी अथवा त्याआधी पंतप्रधानांची सभा होण्याची दाट शक्यता आहे.