Narendra Modi : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी फोडणार लोकसभा निवडणुकीचा नारळ? शिवजयंतीनिमित्त करणार दौरा, जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम…


 Narendra Modi : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून, भाजपकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये विविध कामांची उद्घाटने होत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे.

पुढील महिन्यात १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत असे सांगितले जात आहे. या दौऱ्यात मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहे.पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

शहरात लोहगाव विमानतळाचे नवे टर्मिनस, मेट्रो सेवेचा विस्तार, कात्रज ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच समाविष्ट गावांसाठीच्या काही प्रकल्पांचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे.  त्यातच लोकसभा निवडणूकीची लगबग सुरू झाल्याने पुण्यात भाजपकडून या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधानांच्या दौर्‍याचे औचित्य साधत भाजपकडून विकास कामांसोबतच निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Narendra Modi

लोकसभा निवडणुका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडयात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसरकारकडुन विकास कामांचे उदघाटन आणि भुमिपूजनाचा धडका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापूरनंतर पुण्यातला चौथा दौरा आहे. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं. मुंबईतील ‘न्हावा-शेवा अटल सेतू’चा लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते पार पडला. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!