Narendra Modi : देव आनंदच्या ‘या’ पिक्चरवरुन मिळाली होती नरेंद्र मोदींना प्रेरणा, आज वाढदिवसाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा..

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून जगभरात ओळखले जातात. अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. आज मोदींचा ७३ वा वाढदिवस आहे. याबाबत यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. (Narendra Modi)
पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) सैन्यात भरती व्हायचे होते. त्यांना लहानपणी जामनगरमधील सैनिक शाळेत शिकण्याची इच्छा होती, परंतु पैशाअभावी ते होऊ शकले नाही. यामुळे ती गोष्ट अपूर्णच राहिली.
मोदींनी एकदा सांगितले होते की, ‘एकदा मी माझ्या मित्र आणि शिक्षकांसोबत आर के नारायण यांच्या कादंबरीवर आधारित ‘गाईड’ हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. चित्रपटानंतर माझे मित्रांसोबत खूप वाद झाले.
मी असा युक्तिवाद केला की चित्रपटाची मूळ थीम ही होती की शेवटी प्रत्येकजण आपापल्या विवेकाने समाजाला मार्गदर्शन करतो. पण मी लहान होतो, माझ्या मित्रांनी मला गांभीर्याने घेतले नाही.
नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक शिक्षण वडनगर येथील बीएन हायस्कूलमधून झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ वी, १० वी आणि ११ वीच्या वर्गात संस्कृत शिकवणारे शिक्षक प्रल्हाद पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी नरेंद्रला नरिया म्हणत असे. वर्गात खरे बोलायला तो कधीच घाबरला नाही. तो खोडकर तर होताच पण सर्व शिक्षकांचा आदरही करत असे.’
पंतप्रधानांचे बालपणीचे मित्र जासूद भाई यांनी मीडियाला सांगितले होते की, ‘लहानपणी आमचे सर्व मित्र त्यांना एनडी म्हणायचो. तो मुख्यमंत्री असतानाही आमची भेट झाली. मी त्याला एनडी हाक मारली तेव्हा तो हसला.