Narendra Modi : त्यावेळचे कृषिमंत्री….!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना टोला
Narendra Modi : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे वाढले आहेत. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मनोगतमध्ये विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते काल यवतमाळला आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या भारत आघाडीवर जोरदार टीका केली. ते यवतमाळ, महाराष्ट्रात म्हणाले की केंद्रात विरोधी आघाडीची सत्ता असताना काय परिस्थिती होती हे आठवा. Narendra Modi
कृषिमंत्रीही इथलेच या राज्याचे होते. त्यावेळी दिल्लीतून विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज जाहीर करून मधेच लुटले गेले. असे म्हणत नाव न घेता त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. यावर आता शरद पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यावेळी दिल्लीतून १ रुपया निघायचा आणि १५ पैसे तिथे पोहोचायचे. काँग्रेसचे सरकार असते तर आज तुम्हाला मिळालेल्या २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी रुपये मध्ये लुटले गेले असते, असेही ते म्हणाले.
आता भाजप सरकारमध्ये गरिबांना त्यांचे सर्व पैसे मिळत आहेत. मोदींची हमी आहे. प्रत्येक लाभार्थीला पूर्ण अधिकार आहेत. प्रत्येक पैसा बँक खात्यात जमा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.