Nagpur Hit and Run : बावनकुळे यांच्या मुलाच्या भवितव्याचा अहवाल आला, सात तासांनी आलेल्या ब्लड रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Nagpur Hit and Run : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अर्जुन हावरे आणि मित्र रोनित चिंतमवार यांच्या रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट समोर आले आहेत.
तसेच रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुनच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीलीटरमागे २८ मिलीग्रॅम, तर अन्य मित्र रोनितच्या रक्तात २५ मिलीग्रॅम इतके आहे.
वाहन चालवताना एखाद्या व्यक्तीच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीलीटरमागे ३० मिलीग्रॅम इतके असण्यास परवानगी आहे. त्यामुळे संकेतचे दोन्ही मित्र थोडक्यात वाचले आहेत, असं म्हणता येईल. Nagpur Hit and Run
मात्र रक्ताचे नमुने अपघातानंतर तब्बल सात तासांनी गोळा केल्यामुळे संशय वाढला आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर काही वेळातच मेयो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक शारीरिक तपासणीत ते दोघेही दारुच्या नशेत असल्याचे स्पष्ट केले होते.
एफएसएल अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. कारमध्ये असलेल्या संकेत बावनकुळेंना रक्तातील अल्कोहोल पातळी चाचणीतून वाचवण्यात आले. त्यांचा मित्र अर्जुन हावरे हा ऑडी कार चालवत होता, तर रोनित चिंतमवारही कारमध्ये बसला होता.