नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत! पुन्हा होणार भिर्रर्र, अटी मात्र लागू…
पुणे : राज्यातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर अनुमती दिली. त्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. असे असताना ज्या कारणांनी अशा खेळांवर बंदी घातली गेली ती कारणे सर्वोच्च न्यायालयाने चुकीची ठरवलेली नाहीत की, अमान्यही केलेली नाहीत.
उलट असे प्रकार घडतात व ते चुकीचे असल्याने ते कायदेशीरपणे रोखण्याची जबाबदारी ही सरकार व प्रशासनावर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
प्राणीहक्क चळवळीतील लोकांचाही शर्यतीच्या परंपरेस विरोध नव्हताच. असेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने परंपरांचा मान राखला आहे व त्या जपण्यास परवानगीही दिली आहे.
दरम्यान, शर्यत जिंकण्यासाठी वाट्टेल ते या प्रवृत्तीतून अतिरेकी कृत्यांना सुरुवात झाली. बैलांना चाबकाने फोडून काढणे, चाबकाला खिळे लावून त्यांना मारणे, शेपट्या पिरगाळणे, शेपट्यांना चावा घेणे, बैलांना दारू पाजणे असे गैर प्रकार सुरू झाले आहेत.
यामुळे सध्या अनेक नियम अटी लागू केल्या आहेत. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.