सौदर्यासाठी स्वयंपाकघरात ‘या’ वस्तू हव्याच..!


उरुळीकांचन : आपल्या जेवणात खूप साऱ्या वस्तू आपल्याला फक्त ऊर्जाच देत नसतात, तर त्या जीवनसत्त्वांचे आणि खनिज क्षारांचे भांडारही असतात. तसेच त्यांना औषधी महत्त्वही असते.

स्वयंपाकघरातील छोट्या-छोट्या जडीबुटी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. आरोग्य आणि सौंदर्याचा बाजारही या जडीवुटींवरच चालतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात काही वस्तू या हव्याच ! त्या वस्तू नेमक्या कोणत्या ते आपण बघुयात .

हिंग : कफ व अस्थमाच्या रुग्णांसाठी हा उपयुक्त असतो. काश्मिरातच नव्हे, तर हिमाचल प्रदेशातही हिंगाद्वारे पदार्थ ओवा सुगंधित व स्वादिष्ट बनवले जातात. अन्न शिजवल्यानंतर थोड्याशा तेलात हिंगाची दिलेली फोडणी जेवण सुगंधित बनवते.

लवंग : लवंग ॲण्टीसेप्टिक असते व दातदुखीवर लवंगाचे तेल उपयुक्त असते. लवंग चावल्याने दातांची कॅव्हिटीपासून सुटका होते. ही शरीर गरम ठेवते, त्यामुळे हिवाळ्यात लवंगेचा अन्नात विशेष वापर केला जातो.

ओवा : आयुर्वेदात ओव्याला अनेक रोगांच्या उपचारांत सहायक घटक मानले गेले आहे. अपचन, गॅस, उचकी आल्यास याचा वापर केला जातो. यामुळे डोकेदुखी व सर्दीही हटवता येते.

जिरे : पोटदुखी, पोटातील कृमी, उचकी . मध्ये जिरे खाणे फायदेशीर असते. जिरे कोणत्याही पदार्थात भाजून वा तेलात परतून घातले जाते. हे अन्नाला एक प्रकारचा सुवास देते.

दालचिनी : बिर्याणी व पुलावात दालचिनी अत्यावश्यक असते. ही पदार्थ सुगंधित करते. दालचिनीचा वापर पोटासंबंधित आजारात व स्वयंपाकात होतोच शिवाय लवंग दालचिनी तोंडात धरल्यास श्वासही सुगंधित होतो.

धने : धने श्वासनलिकेतील अडथळे दूर करतात व पोटाची सफाई करतात. धने पुदिन्याची चटणी अत्यंत स्वादिष्ट लागते. तयार भाजी सजवण्यासाठी कोथिंबीर (धन्याची रोपे) वापरली जाते. तशीच ती स्वादही वाढवते. धने कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारे समजले

मेथ्या : हे एक लोकप्रिय नैसर्गिक ॲण्टीडायबेटिक औषध आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही मधुमेहींप्रमाणे मधुमेह नसणाऱ्या व्यक्तींसाठीही फायदेशीर आहे. याचे असंख्य फायदे आहेत जे हे खाऊनच समजू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!