“छत्रपतींचे नाव घेतल्यास मुस्लिम..”, रायगडावर ४० वर्षानंतर गेल्यावर राज ठाकरेंचे शरद पवारांवर शरसंधान


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला आहे, अशी टीका मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळालेल्या तुतारी या प्रश्नचिन्हाचे अनावरण शनिवारी पार पडले आहे. यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांना जोरदार निशाणा साधला आहे.

शिवाजी महाराजाचं नाव घेतली की मुस्लीमांची मते जातील अशी भीती इतकी वर्षे वाटत होती. आता त्यांना शिवाजी महाराज आठवत आहे. मागे मी पवारांची मुलाखत घेतली होती तेव्हाही त्यांना मी विचारले होत की तुम्ही नेहमी शाहु, फुले आणि आंबेडकराचं नाव घेता, शिवाजी महाराजाचं नाव का घेत नाही असा सवाल केला होता याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली होती.

राजकारणाचा इतका चिखल यापूर्वी कधी झाला नव्हता. आता कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नसल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. आपण एखाद्या समवेत व्यासपीठ शेअर केले म्हणजे आमची युती झाली असे होत नाही असेही ठाकरे म्हणाले आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी १०० व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात काही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले, अशी एक आठवण राज ठाकरेंनी सांगितली. ते म्हणाले, “मी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारलं कोणत्या गटाचे? तेव्हा दोन-तीन जण म्हणाले शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटातून आहोत.असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहीजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!