हत्या केली, 30 किलोमीटर चालत गाठला हायवे, नंतर…!! संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

बीड : बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. आता दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीआयडी आणि एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. संतोष देशमुख यांची केज तालुक्यातील मांजरसुंबा टोलनाक्याजवळ अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपी आता कुठे पकडले गेले आहेत, मात्र एकजण अजूनही फरार आहे. त्याचा तपास सुरू आहे.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यामधून पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी सुरू आहे. याबाबत हत्या केल्यानंतर पोलिसांना चकवा देऊन आरोपी कुठे आणि कसे गेले याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर सुदर्शन घुले आणि साथीदार वाशी या गावमधून फरार झाले. आरोपींनी आपल्या गाड्यांचा वापर केला नाही. मुख्य तीन आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी जंगलातील रस्त्याने निघायचे ठरवले. हे आरोपी शेतातून ३० किलोमीटरपर्यंत बीडच्या हद्दीतून बाहेर पडले. पोलीस नाकाबंदी केली होती.
जिल्ह्यातून बाहेर पडत हायवेवरून खासगी ट्रॅव्हलने तिथून संभजीनगर गाठलं. पोलीस मागावर असल्याने तिथून त्यांनी पळ काढला. त्यांनी पुण्यातील भोसरीमध्ये ओला कॅब केली. भोसरीमधून त्यांच्या गावातील मित्राकडे गेले. तिथे दीड दिवस राहिले पण नंतर त्यांनी राज्य सोडायचे ठरवले. नंतर ते गुजरातमधील गिरनार मंदिरामध्ये गेले.
गिरनार मंदिरामध्ये तिघेही १५ दिवस राहिले. पैसे संपल्यावर त्यांच्यामधील कृष्णा सांगळे हा व्यवस्था लावण्यासाठी पुण्याला आला होता. पण तो माघारी न परतल्याने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्याला आले. पुण्यातील बालेवाडी येथे बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.