मोठी बातमी! मुंबई-पुणे महामार्ग ठरला पुन्हा जीवघेणा, कार कंटेनरचा भीषण अपघात; २ ठार, ४ जण जखमी..
पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर आज (ता.२१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. कारचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
यामध्ये एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथामिक माहिती आहे. कारमधील इतर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
Views:
[jp_post_view]