Mumbai : पोलीस दलात खळबळ! कर्मचाऱ्याची नोट लिहून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?


Mumbai : मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री घडली आहे. विजय साळुखे (वय.३८) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी सायनमधील प्रतीक्षा नगर येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

सुसाईड नोट सापडली..

पत्नीच्या त्रासाला कंटाळून विजय यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून पोलिसांनी जप्त केली आहे. Mumbai

नेमक घडलं काय?

विजय साळुखे सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत होते. मुंबईच्या शाहुनगर पोलिस स्टेशन मध्ये ३० मे रोजी बदली झाली होती. मात्र आजारपणाचे कारण देत त्यांनी सुट्टी घेतली होती.

साळुंखे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. साळुंखे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी जप्त केली.

साळुंखे यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!