Mumbai Crime News : धक्कादायक! गजबजलेल्या ठिकाणहून १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण, महिन्यानंतर शीर नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ..

Mumbai Crime News : वडाळ्यातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वड्याळ्यातून २८ जानेवारी रोजी १२ वर्षांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शव शांतीनगर खाडीजवळ सापडले होते.
त्यानंतर तब्बल ३५ दिवसांनंतर त्याच ठिकाणी त्याचे मुंडके सापडले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या हत्येप्रकरणी शेजारीच राहणाऱ्या बंगाली तरुणावर संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळ्यातील शांतीनगर परिसरात संदीप यादव हा मुलगा त्याच्या पालकांसोबत राहत होता. 28 जानेवारी रोजी शेजारी राहणाऱ्या विपूलने कोल्ड्रिंक प्यायच्या बहाण्याने त्याला घेऊन गेला.
तेव्हापासून संदीप घरीच परतला नव्हता. त्याचबरोबर बिपूल सरकारी हा बंगाली तरुणही गायब होता. त्यामुळं संशयाची पहिली सुई त्याच्यावरच जात होती. २८ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास १२ वर्षीय मुलगा घराबाहेर पडला होता.
त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या पालकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तेव्हा सीसीटिव्ही फुटेज तपासले असता तो शेजारी राहणाऱ्या बिपूलसोबत जात असल्याचे दिसले. फ्री-वेच्या खाली वडाळा येथील निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी तो घेऊन गेल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. Mumbai Crime News
रात्री १२ च्या सुमारास बिपुल घरी आल्यानंतर त्याला शेजाऱ्यांनी पकडून चोप दिला. तसंच, मुलगा कुठे आहे याची विचारणा केली. तेव्हा त्याने मुलाला तृतीयपंथीयाला विकले अशी बतावणी केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला पोलिसांत दिले. मात्र तिथे तो बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने पळाला.
बिपीन पसार झाल्यानंतर तब्बल ३५ दिवसांनंतर म्हणजेच सोमवारी कुजलेल्या अवस्थेतील धड आणि मंगळवारी शिर वडाळ्यातील खाडीजवळ सापडले. मृतदेहाच्या अंगावरील टी शर्ट आणि हातातील कडं यावरुन मृत मुलाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आहे आहे. बिपीननेच संदीपची हत्या केली का व त्यामागचा उद्देश काय? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
दरम्यान, संशयित आरोपी बिपीन हा पॅरोलवर सुटून आला होता. त्याच्यावर स्वतःच्याच पत्नीची हत्या केल्याचा संशय आहे. पॅरोलवरुन बाहेर आल्यानंतर तो मुंबईत राहू लागला. काही दिवसांपूर्वीच त्याने संदीप यादवच्या घराशेजारील खोली भाड्याने घेतली होती.
येथूनच तो मुलांच्या तस्करीत उतरल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह अमानुष अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला नागरिकांनी पकडून दिल्यानंतरही त्याने पळ काढला यामुळं नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिस आरोपी शिकारीचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, त्याने हत्या का करण्यात आली हे अद्यापही समोर आलेले नाही.