मुकेश अंबानींचं जिओ ग्राहकांसाठी स्पेशल गिफ्ट, आज रिचार्ज करा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे…


नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांनी जिओ युजर्ससाठी एका खास फेस्टिव्ह ऑफर आणली आहे. जिओ यूजर्सना कमी किमतीत दीर्घकाळ चालणारे रिचार्ज प्लॅन मिळत आहेत. जर तुम्ही आज Jioचे रिचार्ज केले तर तुम्हाला प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा, जिओ सिनेमा सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभही मिळणार आहे.

विशेष म्हणजे जिओचा हा रीचार्ज प्लान ७२ आणि ८४ दिवसांची व्हॅलिटीडी ऑफर करत आहे. ७४०९आणि १०२९ रुपयांमध्ये तुम्हाला जास्त व्हॅलिडिटी सह अनलिमिटेड डेटासुद्धा मिळणार आहे. या प्लानचे संपूर्ण डिटेल्स आपण जाणून घेऊयात..

जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसाची नव्हे तर त्याऐवजी ७२ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्यामध्ये यूजर्सना ७२ दिवसांसाठी अमर्यादित डेटा, अमर्यादित व्हॉइसकॉलिंग आणि Jio सिनेमाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळू शकते.

दरम्यान, या प्लानमध्ये तुम्हाला एकूण १६४ GB डेटा मिळतो. तुम्ही दररोज हाय स्पीड २ GB डेटा आणि + २० GB डेटाचा लाभ घेऊ शकता. म्हणजे एक प्रकारे हा यूजर्ससाठी अमर्यादित डेटा आहे.

तुम्ही दिवसभर इंटरनेट वापरत असलात तरी तुम्ही २ किंवा ३ जीबीपेक्षा जास्त वापर करू शकत नाही. याशिवाय, तुम्हाला दररोज ऑफलाइन चॅटिंग करण्याची संधी मिळत आहे. काहीवेळा जर इंटरनेट काम करत नसेल तर तुम्ही दररोज १०० एसएमएसचा लाभ देखील घेऊ शकता. मनोरंजनासाठी, Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud वर ॲक्सेस देखील मिळणार आहे.

या प्लानमध्ये जिओ यूजर्सना ८४ दिवसांची वैधता मिळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये यूजर्सना दोन OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्स हे Jio Cinema आणि Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन देखील मिळवू शकता.

या प्लॅनमध्ये एकूण १६८ GB फ्री डेटा उपलब्ध आहे. तुम्ही दररोज हाय स्पीड २ GB डेटाचा आनंद घेऊ शकता. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस विनामूल्य उपलब्ध असतील. त्यामुळे यूजर्ससाठी ही चांगली संधी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!