Mukesh Ambani : २० कोटी द्या नाहीतर..; उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Mukesh Ambani मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत, तर ठार मारू असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हंटले आहे. Mukesh Ambani
मिळालेल्या माहिती नुसार, २७ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने ई-मेलमध्ये म्हंटले.
तसेच या धमकीचा ई-मेल आल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुकेश अंबानींना धमकी मिळण्याचीही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी गेल्या वर्षी बिहारमधील दरभंगा येथील एका व्यक्तीला मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
राकेश कुमार मिश्रा असे या आरोपीचे नाव असून तो बेरोजगार असून त्याने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही दिली होती.
तर फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास स्थानाबाहेर २० स्फोटक जिलेटिन काठ्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. पत्रात “हा फक्त ट्रेलर आहे असे लिहिले होते. आता पुन्हा एकदा धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.