MPSC PSI Exam Schedule Changes : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, जाणून घ्या..


MPSC PSI Exam Schedule Changes : पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. एमपीएससीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे १५ ते १७ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे.

मात्र, लोकसभा निवडणूक पाहता १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यावेजी २९, ३० एप्रिल आणि २ मी रोजी होणार आहे. बाकी इतर तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

याबाबत एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक १५ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे विचारात घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. MPSC PSI Exam Schedule Changes

तथापि भारतीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता दिनांक १९, २६ व २७ एप्रिल २०२४ रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे दिनांक २९, ३० एप्रिल २०२४ व २ मे २०२४ या दिवशी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीकडून सांगण्यात आले आहेत.

वेळापत्रकात असा बदल…

१९ एप्रिलचा ग्राउंड २९ एप्रिलला होणार आहे.
२६ एप्रिलचा ग्राउंड ३० एप्रिलला होणार आहे.
२७ एप्रिलचा ग्राउंड २ मे रोजी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!