आईने आपल्या इवल्याशा बाळाला 3 लाखांसाठी विकलं; सोलापुरातील धक्कादायक प्रकार


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ दिवसांच्या नवजात बाळाच्या विक्रीचा प्रकार समोर आला असून, या बालकाला 3 लाखांत विकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ दत्तक दिल्याचा खोटा बॉण्ड त्यांनी केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आईने बाळास नऊ महिने सांभाळले, तिनेच जन्माच्या अवघ्या १८ व्या दिवशी बाळ विक्री केले. त्यांनी आपले बाळ दत्तक देत असल्याचा बाँड केला. मात्र हे बाळ कोणाला देणार याचा उल्लेख बाँडमध्ये केला नाही.

पोलिसांनी घटनेचा तपास करताना आईनेच आरोपीला आपले बाळ तीन लाखात विकल्याचे निष्पन्न झाले. याप्रकणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई – वडिलांनी फक्त 3 लाखांसाठी बाळाची विक्री केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!