लाडक्या बहिणींना धक्का!! या बहिणींचे पैसे पुन्हा सरकारकडे जमा, जिल्ह्यात कारवाई सुरू….

मुंबई : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचे सुरुवातीला हप्ते जमा झाले मात्र नंतर हे हप्ते येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला. असे असताना आता सरकारकडून एक मोठं पाऊल उचलले आहे. यामुळे बहिणींना मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना मिळालेले पैसे आता परत घेतले जात आहेत. धुळे जिल्ह्यात एका महिलेचे ७५०० रुपये सरकारने परत घेतले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता सरकारने नियम बदलले आहेत.
या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सरकारने योजनेचे अर्ज तपासण्यास सुरुवात केली असून अशाच प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे. निकष डावलून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली असून त्याअंतर्गतच पाऊल उचलण्यात आले आहे.
त्यामुळे अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात आली. धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले ७५०० रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात अजून मोठ्या कारवाया सरकार करणार आहे.
सुरुवातीला विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. नंतर निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं, यामध्ये पैसे वाढतील असे सांगण्यात आलं मात्र आता नियम कडक करण्यात आले आहे.
पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता येणाऱ्या काळात अजून काही निर्णय सरकार घेणार का? याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे. योजनेवर देखील अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत.