मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुणे येथील रेल्वे विभागाचा आढावा…..
पुणे: नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे येथील रेल्वे विभागाचा आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीला विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांनी मंत्री मोहोळ यांचे स्वागत केले आणि 2023-24 आणि जून 2024 या आर्थिक वर्षातील विविध प्रकल्प, नवीन मार्गांचे सर्वेक्षण, RLDA आणि स्थानकांच्या पुनर्विकासाबाबत चर्चा केली.
यावेळी विभागातील नवीन प्रकल्प आणि संरचनात्मक कामे यांची माहिती मोहोळ यांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली. यामध्ये मिरज-कोल्हापूर, फलटण-पंढरपूर, पुणे-बारामती, फलटण-मिरज, तळेगाव-उरुळी-राजेवाडी, पुणे-अहमदनगर यासारख्या नवीन मार्गांचे सर्वेक्षण. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाचे सर्वेक्षण. पुणे-लोणावळा दरम्यान 3 आणि 4 उपनगरीय कॉरिडॉरचा विकास. यासह
स्थानक आणि रस्ते विकासाबाबत मंत्री मुरलीधर मोहोळ यांना माहिती देण्यात आली. यामध्ये हडपसर स्टेशन अप्रोच रोडचे रुंदीकरण.शिवाजीनगर, घोरपडी, चिंचवड आणि पुणे स्टेशनवरील अतिक्रमण हटवणे. ताडीवाला रोडवरील वाहतूक कोंडी आणि बहुस्तरीय पार्किंगची समस्या सोडवणे. फुरसुंगी गुड्स शेडला जाण्यासाठी रस्त्याची मागणी. याबतचे सादरीकरण रेल्वेच्या अधिकार्यांनी केले.
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सादरीकरणाद्वारे दिलेल्या माहितीचे कौतुक केले आणि पुणे व शिवाजीनगर रेल्वे स्थानकांच्या सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने सर्वसमावेशक कामे करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी पुणे विभागाला आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले आणि राज्य प्राधिकरण व केंद्रीय मंत्रालयाशी सल्लामसलत करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी श्रीमती इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक; श्री प्रकाश उपाध्याय, सीपीएम (जीएसयू); डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आणि सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते.