मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री? काँग्रेस नेत्यांन केला धक्कादायक उलगडा….


मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली असतानाच काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत मनसेसोबत कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने सहयोगी पक्षांसोबत युती करण्यास हरकत नसल्याचे सांगितले, मात्र ही युती केवळ इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच असेल, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आला असताना मविआमधील प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. महाविकास आघाडीसोबतच्या मतदारयादी घोळाविरुद्धच्या आंदोलनात, बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यामुळे मनसेदेखील आता महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस नेत्याने केलेल्या धक्कादायक उलगड्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!