शरद पवारांकडे आमदारांची आग्रही भूमिका, आता अजित पवारांसोबत चला, रोहित पवारही आग्रही? नेमकं काय घडतंय?


पुणे : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांनी अजित पवार यांच्यासमवेत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शरद पवार यांनी मोजक्या विश्वासू नेत्यांच्या घेतलेल्या बैठकीत काही आमदारांनी आता अजित पवार यांच्यासमवेत गेले पाहिजे, अस सांगितलं आहे.

याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध टोकाचे ताणले गेले. नंतर मात्र अजित पवार शरद पवार एकत्र आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यांच्या संवाद होत आहे.

असे असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांनीच अजित पवार यांच्या समवेत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. पक्षातील दहापैकी पाच आमदारांनी यासंबंधीचे स्वाक्षरीचे पत्रच पवारांना दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख आमदारांचा समावेश आहे. पवार यांनी पक्षाची आगामी दिशा ठरविण्यासाठी काही मोजक्या विश्वासू नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये यावर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीला आमदार रोहित पवारही उपस्थित होते. त्यांनीही आता अजित पवारांसमवेत गेले पाहिजे, अशीच भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे आमदारांच्या भूमिकेला समर्थन मिळाले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यात अनेक घडामोडी घडू शकतात. काही आमदारांनीही विरोधी पक्षात राहून काहीच साध्य होणार नाही.

मतदारसंघातील कामे करण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. दिशा पाहूनच अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. यामुळे आगामी काळात पक्ष काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!