Shahaji Bapu Patil : आमदार शहाजी बापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का! पुतणे शरद पवार गटात करणार प्रवेश?

Shahaji Bapu Patil : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. शहाजी पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
आमदार शहाजी बापू पाटील यांचे पुतणे संग्राम सिंह पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी स्वतः शहाजी बापू पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Views:
[jp_post_view]