Mla Ravindra Dhangekar : पुण्यात आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या..
Mla Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तयांच्यावर टीका देखील केली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यात आशानगर या ठिकाणी महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी महापालिकेने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रमातून काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकावले होते. Mla Ravindra Dhangekar
दरम्यान, या प्रकरणामुळेच आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.