होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी, आता आमदाराने केली मोठी मागणी.
पुणे : काल पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यामुळे सायंकाळी भलेमोठे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले. यामुळे एकच खळबळ उडाली. तसेच यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी अनधिकृत होर्डिंग्जवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर द्यावी,असेही ते म्हणाले. शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न या होर्डिंग दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर जैसे थे आदेश असल्याने पिंपरी महापालिकेला या अवैध होर्डिंग्जवर कारवाई करता येत नसल्याचे वाघ यांनी सांगितले. शहरात हे एकच नाही, तर असे शेकडो बेकायदेशीर फलक आहेत.
काही जाहिरात एजन्सी या परवानगीपेक्षा अधिक ती उभारत आहेत. त्यामुळे पालिकेचा महसूलही बुडत आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी रात्री साडेवाजेपर्यंत पोलिसांनी कसलाही नोंद केली नव्हती.