Mithun Chakraborty : जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल…

Mithun Chakraborty : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येते आहेत. मिथुन यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आज १० फेब्रुवारी शनिवार रोजी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यापासून चाहते त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
सध्या तरी अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून ते ‘शास्त्री’ या सिनेमाचं शुटींग देखील करत होते. मिथुन चक्रवर्ती आता ७३ वर्षांचे आहेत. Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्ती यांना मध्यरात्री स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना तात्काळ कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपोलो हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे.
न्यूरोसर्जन डॉ. संजय भौमिक अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या तरी या दिग्गज अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नुकतेच मिथुन यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.