उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात, एकजण जागीच ठार, एक गंभीर जखमी…

उरुळी कांचन : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात कठड्याला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात दुधाच्या टँकरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकणी आता टँकरचालकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना शिंदवणे घाटात गुरुवारी (ता.१६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वैभव शिवाजी जामदार (वय ३४ रा. बेलवाडी ता इंदापूर जि पुणे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तर कुंवर पाल (वय. 35 वर्षे) पत्ता राजपाल क्योनासूरतपुर हैदरगंज उर्फ अलीगंज, बरेली उत्तरप्रदेश 243302) असे मृत्यू व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी सुदर्षन धनराज माने (वय.३२ वर्षे) पोलीस कान्टेबल नेमणूक उरुळी कांचन पोलीस स्टेशन जि. पुणे, यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (ता.१६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मौजे शिंदवणे गावचे हद्दीत शिंदवणे घाटाचे मध्ये भागी वाघापुर बाजुकडून उरूळी कांचन बाजुकडे येणारा भारत बेनज कंपणीचा एम. एच. 42 टी./3800 दुध टेंकर कुंवर चालक पाल याने रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून हयगईने अविचाराने टँकर भरधाव वेगात चावल्याने स्वःताचे मृत्युस तसेच त्याचे बाजुस बसलेला रूट सुपर वायझर यांचे किरकोळ व गंभीर दुखापत व टँकरचे नुकसाणीस कारणेभुत झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
