MI vs CSK : रोहित शर्माची पॅन्ट फिल्डींग करताना उतरली! कॅमेरात क्षण टिपल्याने क्रिकेटपटूंत अस्वस्थता..!!
MI vs CSK : मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर रोहित शर्मा रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या हायप्रोफाईल सामन्यात अनपेक्षित घटनेचा बळी ठरला. लाइव्ह मॅचमध्ये फिल्डिंग करत असताना कॅच घेताना रोहित शर्माची पॅन्ट उतरली. कॅमेऱ्याचे लक्षही लगेच रोहित शर्माकडे गेले, त्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूला खूप अस्वस्थ वाटू लागले.
यादरम्यान ऋतुराज गायकवाडचा झेलही रोहित शर्माच्या हातून निसटला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच झालं असं की, चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील १२व्या षटकात आकाश मधवाल गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड स्ट्राईकवर उपस्थित होता. MI vs CSK
12व्या षटकात, आकाश मधवालच्या चौथ्या चेंडूवर, ऋतुराज गायकवाडने मिडविकेटवर एक हवाई शॉट खेळला, जिथे रोहित शर्मा उभा होता. ऋतुराज गायकवाडचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माने डायव्हिंग केले. या काळात रोहित शर्माला आपला तोल सांभाळता आला नाही आणि त्याच्या हातातून चेंडू निसटला. त्याचबरोबर त्याची पॅन्टही खाली घसरली.