Mauli Katke : शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटकेंचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश! शिरुर- हवेलीत महायुतीच्या उमेदवारीचा सन्पेन्स वाढला..

Mauli Katke उरुळीकांचन : शिरुर -हवेली मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेक्षाने शिरूर -हवेली ची विधानसभेची जागा राष्ट्रवादीला जाणार का म्हणून चर्चेला उधाण आले असून या जागेवर अजित पवार यांचा उमेदवारीचा शोध संपलाय का म्हणून चर्चेला उधान आले आहे.
शिरुर -हवेली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेल्या शिवसेना उबाठा गटाचे माऊली कटके यांनी सोमवार (दि.२१) पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे उपस्थित होते. महाविकास आघाडीत शिरूर- हवेली ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना निश्चित झाल्याने उमेदवारी स्पर्धेत असलेल्या माऊली कटके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. Mauli Katke
दरम्यान शिरुर-हवेली मतदारसंघातील या जागेसाठी महायुतीत जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. या जागेसाठी भाजप कडून प्रदिप कंद यांचे व जागा राज्य कोअर कमिटीने हायकमांड कडे पाठविले आहे. या जागेसाठी महायुतीत बोलणी सुरू आहे.
अशातच या जागेसाठी अजित पवार यांनी माउली कटके यांना प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी कडून कटके यांचे नाव अंतिम होणार काय ? चर्चेचा खल सुरू आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माऊली कटके यांनी ठाकरे गटात जिल्हाध्यक्ष पदावर काम केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्यपद भूषविले आहे. शिरुर-हवेलीत त्यांनी विधानसभेपूर्वी देवदर्शनाचा यात्रा काढून लोकप्रियता मिळविली आहे.