पुण्यात होणार जल्लोष! २७ वर्षांनंतर वर्ल्डकपमधील ५ मॅच गहुंजे स्टेडियमवर, पुणेकरांना मोठी मेजवानी…


पुणे : क्रिकेट हा भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातच पुण्यात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटप्रेमी आहेत. यातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

भारतात यंदा ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतील तब्बल पाच सामने यंदा पुण्याला मिळाले असून यामुळे पुणेकर आनंदात आहेत

पुण्यात होणारे सामने..

१९ ऑक्टोबर : भारत वि. बांगलादेश

३० ऑक्टोबर : अफगाणिस्तान वि क्वालिफायर २

१ नोव्हेंबर : न्यूझीलँड वि. दक्षिण आफ्रिका

८ नोव्हेंबर : इंग्लंड वि. क्वालिफायर १

१२ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश.

वरील चार सामने दुपारी २ वाजता सुरू होतील. ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामना सकाळी १०:३० ला सुरू होईल. अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.

पुण्यातील गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर हे पाच सामने खेळण्यात येणार आहेत.  २७ वर्षांनंतर पुण्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तब्बल पाच सामने रंगणार आहेत. पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील याआधीचा शेवटचा सामना २० फेब्रुवारी १९९६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया यांच्यात नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला होता.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे सांगितले. भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यांशिवाय इतर चार सामने पुण्यात होतील.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआय यांचे आभार मानतो. अन्य राज्य संघटनादेखील या सामन्यांच्या आयोजनासाठी प्रयत्न करत होत्या. बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखवला, असे रोहित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!