Maratha Reservation : …तर फडणवीसांच्या दारात बसू!! आता आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईतील मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहचले आहे.
आंदोलनासाठी परवानगी नाही मिळाली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील आणि नागपुरातील दारात बसू असा इशारा मनोज जरांगेनी केली आहे. २० जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार, असे देखील जरांगे यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे म्हणले, मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळणार आहे. परवानगी नाही मिळाली तरी निश्चित केलेल्या मैदानावर आंदोलन करणार आहे. खूप ताकतीने समाज एकत्र येणार आहे. मुंबईतील समाजाने एकत्रित यावे. Maratha Reservation
आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील आणि नागपूरातील घरासमोर बसणार आहे .मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. मराठा बांधवांनी घाबरू नये उलट मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला. मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. २० जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. Maratha Reservation
मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला येणार असून मुंबईतील सर्व मैदाने आम्हाला लागणार आहेत. त्यामुळे आाता सरकारची जबाबदारी आहेत त्यांनी आम्हाला मैदाने द्यावीत अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.