Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला बसणार मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा दिला इशारा..
Maratha Reservation आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील गावागावात मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. Maratha Reservation
याच दरम्यान भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांना आरक्षण न दिल्या २०२४ मध्ये निवडणूक लढवणार नाही असा इशारा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या आक्रमक पावित्र्यानंतर आमदार तानाजी मुटकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. Maratha Reservation
तसेच जर येत्या काही दिवसात मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आगामी २०२४ ची निवडणूक मी लढवणार नाही. मराठा बांधवांवरील अन्याय पदावर राहून सहन करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणMaratha Reservation मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. येत्या अधिवेशनामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडू असे मुटकुळे म्हणाले आहेत.
‘मराठा समाजाला आरक्षण न नसल्याने ज्या अडचणी येतात, त्या मला माहिती आहे. मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्या काळात बऱ्याचशे मराठा समाजातील मुले तहसीलदार, नायब तहसीलदार, डॉक्टर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, असे ते पुढे म्हणाले.