Maratha Reservation : मराठा आरक्षण लढाईला मोठा धक्का! मराठा नेत्यानेच सुरू केले मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन…


Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारच्या नाकात दम आणला असताना मनोज जरांगे यांच्यासमोर अडचण उभी केली गेली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता एकीकडे अण्णासाहेब शिंदे यांचे आक्रमण सुरू झाले आहे.

अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते, मात्र त्यांनी त्यांची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे अण्णासाहेब शिंदे आक्रमक झाले असून ९ सप्टेंबरपासून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. Maratha Reservation

अण्णासाहेब शिंदे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, तुम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी शरद पवारवर दोषारोप करत आहात. एकनाथ शिंदे सारख्या सक्षम मुख्यमंत्रीने मेहनत करून ओबीसी प्रमाणपत्र मिळवले, आणि तुम्ही राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली आहे. आम्ही तुम्हाला एक महिन्याची मुदत देतो, या मुदतीत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवा.

अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी बार्शी शहरातील शिवसृष्टी परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्याची मागणी केली आहे.

या आंदोलनामुळे सध्या बार्शीतील वातावरण चांगलेच तापलेले आहे, आणि स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!