Manoj Jarange Patil : सरकारचे टेन्शन वाढणार! मनोज जरांगे यांची तोफ पिंपरी चिंचवडमध्ये धडाडणार?


Manoj Jarange Patil पिंपरी चिंचवड : मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात दंड थोपाटणार आहे. त्यात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला २२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. Manoj Jarange Patil

याप्रश्नी सरकारवरील दबाव आणखी वाढविण्यासाठी ते पुन्हा काही अशा सभा घेणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे साखळी उपोषण राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे एक ऑक्टोबरपासून सुरू आहे. Manoj Jarange Patil

दररोज दोन-तीन गावांतील शे-दीडशे ग्रामस्थ त्यात भाग घेत आहेत. या आंदोलनाला विसाव्या दिवशी जरांगे-पाटील हे भेट देणार आहेत. त्यावेळी त्यांची तिथे जंगी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी कालपासून सुरू झाली आहे.

या प्रश्नी सरकारवरील दबाव आणखी वाढविण्यासाठी मराठा समाजाने आता स्वतःहून जरांगे पाटील या आपल्या नव्या हिरोच्या सभा २२ ताऱखेच्या आत घ्यायचे ठरविले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही मराठा आऱक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण झाले होते. त्यामुळे आपल्याकडेही जरांगे-पाटलांची सभा घेण्याचे तेथील मराठा क्रांती मोर्चाने ठरवले आहे.

दरम्यान, त्याच्या नियोजनाची बैठक मंगळवारी संध्याकाळी होत आहे. सरकारवर दबाव वाढवून आरक्षण मिळविणे हा हेतू त्यामागे असल्याचे या सभेच्या एका स्थानिक मराठा मोर्चाच्या कार्यकर्ता आयोजकाने ही माहिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!