Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा, जरांगे यांचा मोठा निर्णय, आजची रात्र…


Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून शर्थीच प्रयत्न सुरु आहेत. मनोज जरांगे यांची पायी दिंडीयात्रा नवी मुंबईत वाशीमध्ये पोहोचली आहे. याठिकाणी हजारो मराठा बांधवांचा जनसागर उसळला आहे.

सरकारने आपल्या सर्व मागण्यावर सकारात्मक असल्याचं सांगितलं, मग आम्हा एक पाऊल मागे घेतो, सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही, आजची रात्र इथेच काढतो, सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. नसेल तर उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार असा इशाराही त्यांनी दिला.

जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण, सगेसोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरती केलाच तर आमच्या जागा राखीव ठेऊन करा या गोष्टींचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. Manoj Jarange Patil

कालपासून सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करत आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी लोणावळ्यात चर्चा केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात १० मिनिटे सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

आंदोलनाला सर्वांना अधिकार आहे. पण ते शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माझा आरक्षणाला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!