Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी केला मोठा दावा, म्हणाले, ‘भाजपातील स्फोट तुम्हाला दिसेल, पक्षातील मराठा…

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारच्या नाकात दम आणला असताना मनोज जरांगे यांच्यासमोर अडचण उभी केली गेली आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यंंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. जरांगे सध्या बीड जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहेत. बीड विधानसभा मतदारसंघातील झालेल्या घोंगडी बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. भारतीय जनता पक्षातील स्फोट तुम्हाला दिसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील घोंगडी बैठका घेत असल्याचं मानलं जात आहे. त्यांनी बीडमधील या कार्यक्रमातही भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केले आहे . Manoj Jarange Patil
निवडणुका जाहीर होताच आपल्याला बैठका घ्यायच्या आहेत. मराठ्यांची हार होऊ देऊ नका. भाजपातील मराठा आता फडणवीसांपासून दूर चालला आहे. भाजपाच्या माजी आमदारांची रांग लागत आहेत. त्यांचे आमदार रात्रीच भेटायला येतात.
भाजपाचा स्फोट तुम्हाला दिसेल, असा दावा त्यांनी केला. भाजपाच्या पुण्यातील एका नेत्यानं फ्लॅट विकला पण, त्याला तिकीट मिळणार नाही, असे म्हणतात, असे जरांगे म्हणाले आहे.