Manoj Jarange Patil : वाघोलीत भगवा सागर लोटणार! जरांगे पाटील यांची आज वाघोली मुक्कामी सभा, सभेकडे राज्याचे लक्ष…


Manoj Jarange Patil उरुळीकांचन : मनोज जरांगे पाटील मुंबई येथे जाण्यासाठी शनिवारी (ता.२०) आंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. पुणे-नगर रोडवरून ते लोणावळा मार्गे मुंबई कडे जाणार आहेत. मंगळवारी (ता. २३) जरांगे पाटील वाघोलीत मुक्काम करून पुढे रवाना होणार आहेत. त्यांच्या व बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची तयारी वाघोली खराडी, लोहगाव, वडगावशेरी परिसरातील मराठा बांधवांनी सुरू केली आहे.

वाघोली खराडी भागात जरांगे पाटील यांचा मुक्काम दौऱ्यामध्ये नियोजित आहे. मराठा बांधवांनी मुक्कामाच्या तयारीबाबत वाघोली, खराडी, चंदननगर, आव्हाळवाडी, लोहगाव, परिसरातील मराठा बांधवांनी नुकतीच वाघोली येथे बैठक घेत जागांची पाहणी देखील करण्यात आली होती.

त्यानुसार चोखीढाणी रोड वरील आर के ग्रुपच्या मोकळ्या मैदानात त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांच्या सोबत किती कार्यकर्ते असतील याचा कोणताही अंदाज नसला तरी हजारो कार्यकर्ते गृहीत धरून तयारी सुरू आहे. चार दिवसात मैदानाची स्वच्छता, भोजन, निवास, पाणी, चहा-नाष्टा व अन्य बाबींच्या नियोजनाची तयारी करण्यात येणार आहे.  Manoj Jarange Patil

जरांगे पाटील यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांच्या भोजनासाठी या परिसरातील जे इच्छुक कुटुंब आहेत त्या प्रत्येक कुटुंबाकडून भाकरी बनवून घेतल्या जाणार आहेत. तर भाजीची व्यवस्था संयोजक करणार आहेत. दुसऱ्या दिवसाच्या न्याहरीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी शिरूर येथील मुक्कामावरून निघाल्यानंतर दुपारी कोरेगाव भीमा परिसरामध्ये भोजन केले जाणार आहे. कोरेगाव भीमा परिसरातील तसेच पेरणे व परिसरातील गावातील मराठा बांधव जेवणाच्या व्यवस्थेचे नियोजन करणार आहेत त्यानंतर वाघोली येथे मुक्कामासाठी येतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!