Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची सर्वात मोठी घोषणा, राज्यव्यापी रास्ता रोकोची दिली हाक…

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता .२०) विशेष अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच आता मनोज पाटील यांनी रविवार (ता.२४) पासून राज्य व्यापी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आमदारांनी मराठा आरक्षणाचा आंदोल शांततेत सुरु राहील असे स्पष्ट करत दररोज दोन टप्प्यात रास्ता रोको आंदोलन होईल. रविवार (ता.२४ ) पासून राज्य व्यापी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या पुढील मराठा आरक्षणासाठी केलेले आंदाेलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्य़ा असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आता आमदारांना दारात बोलवायचे. आता आपण त्यांच्या दारात जायच नाही. ते जे आहेत ते आमच्यामुळे आहेत. रोज रास्तारोको आंदोलन करुन सरकारला निवेदेन द्यायचे तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन द्यावे. राज्यभर आंदोलन रस्त्यावर उतरुन होईल. हे आंदोलन होताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आंदोलन करताना कोणाचीही गाडी जाळायची नाही आहे. Manoj Jarange
मराठा राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर येवू नये. नेता आपल्या दारी आला तर दार लावा. आता आपण आपली ताकद दाखवून द्यायची आहे. ही नेत्यांना गावबंदी नाही, असे सांगत मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेवू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.