मोठी घोषणा! ‘या’ प्रकल्पग्रस्तांना पाचपट भरपाई आणि नोकरी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती..


मुंबई : वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा गारगाई धरण प्रकल्प अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती आणि पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचला आहे.

मुंबईतील पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी गारगाई प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढता पाण्याचा वापर लक्षात घेता, भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे.

त्यामुळे प्रशासनाकडून या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. हा धरण प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे ओगदे आणि खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार असून, तिलमाळ, पाचघर, फणसगाव आणि आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत. धरणासाठी सुमारे ४२६ हेक्टर खासगी जमीन संपादित करावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि पुनर्वसनावर सुमारे २७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गावांतील देवळे, सार्वजनिक स्थळे तसेच इतर महत्त्वाच्या सुविधा स्थलांतरित कराव्या लागणार असल्याने पुनर्वसनाची प्रक्रिया व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!